एव्हरेस्ट सर करणाऱ्या १६ वर्षीय गिर्यारोहक काम्याला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

0

मुंबई – वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले व तिला कौतुकाची थाप दिली. काम्याने आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली. यावर्षी मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला, असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या काम्याने मिशन “साहस” अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech