महाविकास आघाडीच्या बंडखोरांची मनधरणी करण्यात अपयशी

0

पुणे : महायुतीला एकीकडे पुणे शहरातील बंडखोरी रोखण्यात यश मिळाले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र बंडोबांना थंड करणार अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कसबा,पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.कसबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या माजी महापौर कमल व्यवहारे आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बंडखोरांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही प्रमाणात यश आले असून कसबा विधानसभा मतदारसंघातून मुख्तार शेख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech