सुडातून झालेल्या टीकेला कामातून चोख उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून सरकारच्या द्विवर्षपूर्ती निमिताने अभिनंदन

0

 

चौफेर झुंडीने हल्ले होत असताना मन, डोके शांत ठेवून ध्येयावर नजर कशी ठेवायची, हे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले. राजकारण, समाजकारण करत असताना टीका होतच असते. पण सुडाच्या भावनेतून झालेल्या टीकेला शब्दाने नव्हे तर कामाने उत्तर कसे द्यायचे, हे तुम्ही आम्हाला कृतीतून शिकवले आहे.

दगाबाजीच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी राज्यात झालेला उठाव हा अन्यायाविरोधातील लढण्याचा धडा देणारा होता. संकटे झेलून, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन झालेली टीका, अडथळे आणण्याचे प्रयत्न झेलून सरकारचे स्थैर्य राखणे आव्हान होते. कुलुपात बंद असलेला महाराष्ट्र खुला करून सकारात्मकता आणणे आवश्यक होते. हे आव्हान महायुती सरकारने पेलले, याचा प्रचंड अभिमान आहे.

गेल्या दोन वर्षांत २४ तास लोककल्याणाचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार आणि सहकार्याच्या साथीने काम करत आहेत. धडाकेबाज निर्णय घेत आहेत. संकटात पुढे होऊन नेतृत्व कसे करावे, लोकांना आधार कसा द्यावा हे या दोन वर्षांत राज्य सरकारने दाखवून दिले. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा सातत्याने विचार करून नियोजन केले. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत अनेक कल्याणकारी निर्णय घेणे शक्य झाले. याच आठवड्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीजसवलत योजना, युवकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ज्येष्ठांना धार्मिकस्थळांचे दर्शन घडविणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ‘सामान्यांचे, गरीबांचे सरकार’ ही नागरिकांनीच दिलेली ओळख सार्थ ठरवली आहे. शेतकरी, गरीब, युवा आणि महिलांच्या कल्याणाचा सखोल विचार करणे हे समाजकारणात मुरलेली मंडळीच करू शकतात.

गेल्या दोन वर्षांत या सरकारने राज्याला वेगळ्या उंचीवर नेले आहे. प्रगती, विकासाची नवी दिशा दाखवली आहे. पायाभूत सुविधा आणि पर्यावरण रक्षण हातात घालून जाऊ शकते, हे सिद्ध केले आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासाचा महामार्ग प्रशस्त केला आहे. अन्नदात्याच्या पाठिशी सरकार खंबीर उभे राहिले आहे. त्यामुळेच हे जनतेचे सरकार आहे, आपले सरकार आहे.

वंदनीय बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार समाजकारण करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना आणि लोकप्रतिनिधी म्हणून मलाही या सरकारचा आणि नेतृत्वाचा प्रचंड अभिमान आहे. जनता महायुतीला पुन्हा पुन्हा संधी देत राहणार, ही खात्री आहेच.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech