मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंना यंदा पावसाळ्यात छत्री खरेदी करण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. छत्रीचा पुरवठा करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे न आल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना छत्रीसाठी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या शाळेतील पूर्व प्राथमिक ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री दिली जाते. दोन वर्षासाठी हे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षासाठीही महापालिकेने प्रति छत्रीसाठी ५६० रुपये प्रमाणे निविदा मागविल्या होत्या. परंतु छत्रीचा पुरवठा करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे आली नाही. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने अखेर छत्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांंना रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.पालिकेच्या विविध शाळांमध्ये आठवी ते दहावीपर्यंतची ४२,६०६ मुले आणि ४०,७१३ मुली आहेत. आता या सर्वांना हे छत्रीसाठी पैसे दिले जाणार आहेत.