पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स डबघाईला

0

इस्लामाबाद – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली असल्याची परिस्थिती आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स (पीआयए) अनेक अडचणींचा सामना करत आहे. कर्जाच्या डोंगरामुळे ही कंपनी डबघाईला आली असून खासगीकरणाच्या वाटेवर आहे. आता पाकिस्तान सरकार या इंटरनॅशनल एअरलाईन्समधील बहुसंख्य शेअर्स विकण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तान नॅशनल एअरलाईन्सवर गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे सरकार या एअरलाईन्सचे खासगीकर करण्याच्या तयारीत आहे. ‘एआरवाय न्यूज’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समधील आर्थिक नुकसान पाहता एअरलाईन्समधील बहुसंख्य शेअर्स सरकार विकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech