नवदीप सिंगला रौप्य नव्हे तर ‘सुवर्ण’! भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं

0

पॅरिस – पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू नवदीप सिंगने सुवर्णपदक मिळवले आहे. पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 गटात नवदीपने ४७.३२ मीटर अंतर फेकून पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला होता, त्यामुळे त्याला सुरुवातीला रौप्यपदक मिळाले. मात्र इराणच्या सुवर्णपदक विजेत्याचे खेळाडूच्या गैरवर्तनामुळे त्याचे सुवर्णपदक रद्द झाल्यामुळे ते नवदीप सिंगला देण्यात आले. मात्र, या स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या इराणच्या सादेग बेत सयाह याला अखिलाडूवृत्ती किंवा चुकीच्या कृतीमुळे अपात्र ठरवण्यात आले. नियम R8.1 अंतर्गत ही कारवाई झाली, परंतु अपात्रतेचं नेमकं कारण उघड झालं नाही. इराणी खेळाडूला अपात्र ठरवल्यानंतर नवदीपचं रौप्यपदक सुवर्णपदकात रुपांतरित झालं. त्याचबरोबर चीनच्या सून पेंगिझिआंगचं कांस्यपदक रौप्यपदकात बदललं, आणि इराकच्या विल्डन नुखाईवी याला कांस्यपदक मिळालं.

हरियाणाच्या नवदीप सिंगसाठी हे सुवर्णपदक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. २०२०च्या पॅरालिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलेल्या नवदीपने या स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात पॅरालिम्पिक विक्रम मोडला. चीनच्या सून पेंगिझिआंगने २०२१मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नोंदवलेल्या ४७.१३ मीटर विक्रमापेक्षा अधिक अंतरावर नवदीपने भाला फेकला. या सुवर्णपदकासह भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेत ७ सुवर्ण, १० रौप्य, आणि १३ कांस्यपदकांसह एकूण ३० पदकं जिंकली आहेत. ही भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे, ज्यामुळे भारत पदकतालिकेत १६व्या स्थानावर आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech