न्यूयॉर्क – आता गुगल आपल्या यूजर्सना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) फिचरसह प्रीमियम वैशिष्ट्ये देणार असून त्यासह गुगल सर्चसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. आगामी काळात यूजर्सना गुगल सर्चमध्ये एआय फीचर मिळेल, त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतील. गुगलचे हे जनरेटिव्ह एआय सर्च फिचर कंपनीच्या गुगल वन सदस्यता योजनेमध्ये जोडले जाऊ शकते. मात्र एआयशिवाय गुगल वर सर्च आधीप्रमाणेच फ्री असेल. गुगलचे हे जनरेटिव्ह एआय फीचर कंपनीच्या नवीन बिझनेस मॉडेलचा एक भाग असेल.
गुगलच्या या बिझनेस मॉडेलबाबत एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार ७० टक्के युजर्सना गुगलचे सर्च फीचर मोफत वापरायचे आहेत, तर ३० टक्के वापरकर्ते गुगलच्या सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्ससाठी पैसे मोजायला तयार आहेत. हे फीचर्स कधी आणले जाईल याची माहिती अजून देण्यात आलेली नसली तरी लवकरच ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.