मुंबई – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन 15 मार्च पासून बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता 2 जूनपासून वारकऱ्यांना थेट विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. दर्शन बंद ठेवल्यामुळे तेथील व्यावसायिकांवर देखील मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे आता विठुरायांचे दर्शन पुन्हा एकदा सुरु होत असल्यामुळे व्यावसायिक देखील आनंद साजरा करत आहेत.