
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या.

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे 👆👆हे स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे तिथेही त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🕥 10.38am | 20-11-2024 📍 Nagpur.
LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/0DahM1XZe8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 20, 2024

उल्हासनगर महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांनी बजावला मताधिकार

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सपत्नीक कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर आज सकाळी मतदान केले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी बजावला मतदानाचा अधिकार
सेंट स्टॅनिस्लॉस इंटरनॅशनल स्कूल, तळ मजला, खोली क्र २, रामदास नायक मार्ग(हिल रोड), वांद्रे(प) येथे आज सकाळी ७ वाजता मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे मनसे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.@avinash_mns pic.twitter.com/QeBtc98QCN
— Apla Thanekar (@AplaThanekar) November 20, 2024

प्रसिद्ध अभिनेते श्री कुशल बद्रिके यांनी १४० – अंबरनाथ (अ.जा.) मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ६१, महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथे आज मतदान केले.