महाबळेश्वरच्या जंगलात पिसोरी हरणाची शिकार

0

कराड – सातारा जिल्ह्यातील मेढा व महाबळेश्वर तालुक्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात पिसोरी हरणाची शिकार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वन विभागाने अटक केली. शिवाजी शिंदे, दीपक शिंदे, आदित्य शिंदे,सर्व रा.कुरोशी तर गणेश कदम रा.गोगवे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

या टोळीकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी गावठी बंदूक, काडतुसे, वाघर, कोयता व शिकार केलेली पिसोरी हरिणाचा मृतदेह जप्त केला आहे. महाबळेश्वर व मेढा वन विभागच्या संयुक्त पथकानेही कारवाई केली आहे.रविवारी पहाटे महाबळेश्वर व मेढा येथील वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना राजमार्गावरील मोळेश्वर फाटा ते सह्याद्रीनगर रस्त्यावर राखीव वनात दोन व्यक्ती संशयीतरीत्या आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोघांचा संशय आल्याने त्यांनी त्या दोघांची चौकशी सुरू केली.वन कर्मचाऱ्यांनी दोघांजवळील साहित्यांची तपासणी केली असता शिकारी टोळीचे बिंग फुटले. त्या दोघांजवळ पिशवीत वाघर, काडतुसे व कोयता आढळून आला. पकडलेल्या दोघांकडून गावठी बंदूक व बंदुकीच्या मदतीने शिकार केलेली पिसोरी हरिण व इतर साहित्य जप्त केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech