चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील. त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित राहतील. दरम्यान चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यावरुन आता वार- पलटवार सुरु झालेत. चंद्रपुरात मोदींनी चार सभा घ्याव्यात तरीही धानोरकरच निवडणूक येणार असं संजय राऊत म्हणालेत. त्यावर मुनंगटीवारांनी उत्तर दिलंय. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ चंद्रपूर मधून फोडत आहेत. राज्याची पहिली सभा वाघाच्या भूमीत होतं आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. संजय राऊत यांना मुंबईत बसून, दिव्य दृष्टी येते. ते काहीही बोलू शकतात. मंत्रालयात न येता सरकार चालवणारे काय आव्हान देणार अशी टीका केली. लोक मोदीजींना मतदान करतील हा विश्वास आहे.