उष्णतेच्या लाटेमुळे तेलंगणात मतदानाची वेळ वाढवली

0

हैदराबाद – देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट असून पारा ४४ पर्यंत पोहोचला आहे. तेलंगणातही उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेलंगणा येथे मतदानाची वेळ अर्ध्या तासाने वाढवली आहे. तेलंगणात सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. उष्माघातामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ यादरम्यान बाहेर पडणे धोक्याचे असून पुढचे काही दिवस अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी मतदानाची वेळ बदलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

तेलंगणातील १७ लोकसभा जागांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. कडक उन्हामुळे तेलंगणामध्ये मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.१३ मे रोजी करीमनगर, निजामाबाद, जहीराबाद,मेडक, मल्काजगिरी,सिकंदराबाद, हैदराबाद,चेवेल्ला, महबूबनगर,नगरकुर्नूल, नलगोंडा आणि भोगीर येथे मतदान होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech