अकोला – राज्यात बहुतांश भागात बंजारा समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मतदारसंघात बंजारा समाजाचे निर्णयाक मतदान आहे. तर इतरही ठिकाणी मोठं मतदान आहे. तर पोहरादेवीची बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख आहे. पोहरादेवी येथे देशभरातिल बंजारा समाज बांधव येतात. त्यामुळे निवडणूकीपूर्वी बंजारा समाजाच्या काशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देण्यासाठी येणार आहेत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार तयारी सरू करण्यात आली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीला फटका बसलेल्या विदर्भावर नरेंद्र मोदी यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला देखील ते भेट देणार आहेत.
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून राज्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नुकताच केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. दोन दिवस त्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीवर मंथन झाले आहे. आता पून्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होऊ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भाच्या दौर्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या कडून खास विदर्भावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भाच्या दौर्यावर येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाशिम जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती आहे. येत्या 26 सप्टेंबरला ते वाशिमला येणार असल्याची माहिती आहे. यावेळी मोदी पोहरादेवीला भेट देणार आहेत. पोहरादेवी येथे असलेल्या नंगारा वास्तु संग्रहालयाचं लोकार्पण यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नंगारा वास्तु संग्रहालय बंजारा समाजाची संस्कृती देवाणघेवाण करण्यासाठी आणि बंजारा समाजाचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील काही महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.