मुंबई – पुणे-नागपूर , पुणे-दानापूर , पुणे-हजरत नुजामुद्दीन या मार्गावर ७० ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पुणे ते नागपूर दरम्यान ३८ विशेष गाड्या आहेत. दानापुरसाठी ८ तर हजरत निजामुद्दीन साथी २४ गाड्या सोडल्या जाणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात गैरसोय टाळण्यासाठी गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन काही जणांकडून तीन, तीन महिने आधी केले जाते. उन्हाळ्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे आरक्षण मिळत नाही. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनेक गाड्या सुरु केल्या आहे. पुणे, मुंबईतून या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची सोय केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेलीदरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे.