मुंबई – रामदास आठवले यांनी माझा कट्ट्यावरून इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, त्यांच्या काळात ती पूर्ण झाली नाही. आता मात्र लोकांची दिशीभूल करणं, लोकांमध्ये फूट पाडणं आणि भारत तोडोचं काम करणारे, आता काय भारत जोडणार आहेत. मला जागा जरी मिळाली नसली तरी, मी महायुतीसोबत आहे, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. देश प्रगती करताना दिसत आहे. अर्थव्यवस्था सुधारत आहे. इंडिया आघाडीचे लोक म्हणतात मोदी निवडून आल्यावर देशाचं संविधान बदलणार, पण मोदी असं करणार नाहीत. देश कुणी तोडू शकत नाहीत. राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहे, तुमच्या कार्यकाळात तुम्ही भारत का जोडला नाही. त्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. भारत कुणी तोडू शकत नाही, छोटे-मोठे वाद होतात. आंबेडकरांची भूमिका होती की, देशासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे.