मुंबई – नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार सिलिंडरच्या किंमतीत ३०.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १७१७.५० रुपयांना मिळणार आहे, तर दिल्लीत त्याची किंमत १७६४.५० रुपये झाली आहे. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर १८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १९३० रुपयांना मिळणार आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील कपातीमुळे हॉटेलमधील पदार्थांच्या किमतीही कमी होतील अशी अपेक्षा आहे.