सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर परतायला विलंब होणार

0

वॉशिंग्टन –अमेरिकेच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात गेलेल्या सुनीता विल्यम्स व त्यांच्या सहकाऱ्याला पृथ्वीवर परतायला आणखी विलंब होणार आहे. त्यांना पृथ्वीवर आणणाऱ्या कॅप्सुलमध्ये हेलियमची गळती झाल्यामुळे हा विलंब होणार असल्याचे नासाने सांगितले आहे. सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे ५ जून रोजी अंतराळात गेले होते. त्यानंतर ते २६ जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. त्या ऐवजी ते आता २ जुलैला पृथ्वीवर परत येतील. अशी शक्यता नासाने व्यक्त केली होती. ही मोहिम स्टारलायनर या बोईंगच्या यानातून राबवण्यात आली.

सुरुवातीपासूनच या मोहिमेमध्ये अडथळे येत होते. एकदा तर उड्डाणासाठी दोन्ही अंतराळवीर यानात बसल्यानंतर हे उड्डाण रद्द करावे लागले होते. या अंतराळ यानाचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी संपर्क व दोन्ही अंतराळवीरांच्या यानातून स्थानकावर उतरण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. तशाच अडचणी त्यांच्या परतीच्या प्रवासातही येत आहेत. पृथ्वीवर परत येण्यासाठी निघालेल्या कॅप्सुलमध्ये पाच ठिकाणी हेलियमची गळती असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले. ती गळती थांबवल्यानंतर व मिशन व्यवस्थापन दलाकडून इतर तांत्रिक दोष दूर केल्यानंतर हे कॅप्सुल पृथ्वीच्या दिशेने निघणार असून ते २ जुलैला पथ्वीवर येईल असेही नासाने सांगितले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech