रेल्वेचे ‘सुपर ॲप’ देणार एकाच ठिकाणी सर्व सुविधा

0

नवी दिल्ली- रेल्वे विभाग एक ‘सुपर ॲप’ लॉन्च करणार असून या ॲपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक कामसाठी वेगवेगळ्या ॲपची गरज भासणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे ॲप येणार आहे.

सध्या प्रत्येक कामसाठी स्वतंत्र ॲप असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकीट बुंकींगपासून ते रद्द करणे, ट्रेन ट्रॅकिंग – यातही लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल गाड्या – अशा कामांसाठी आयआरसीटीसी रेल कनेकट, रेल मदद, युटीएस, सतर्क, टीएमएस निरीक्षण यांसारखी अनेक ॲप्स कार्यरत आहेत. मात्र, आता प्रवाशांना वेगवेगळी ॲप्स वापरावी लागणार नाहीत. रेल्वेच्या नवीन सुपर ॲपमध्ये सर्व कामे करता येतील, तसेच माहितीही मिळेल. काढलेले तिकीट रद्द करायची सुविधा या ॲपमध्ये अधिक गतीमान करण्यात येणार असून फक्त २४ तासात पैसे खात्यात परत जमा होतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech