राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात ठाण्याचा नंबर दुसरा

0

पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांतील सुमारे सव्वा ९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ८२ लाखांहून अधिक मतदार आहेत. पुण्यात ८२ लाख ८२ हजार ३६३ मतदार असून मुंबई उपनगरांत ७३ लाख ५६ हजार ५९६ मतदार आहेत. तर त्या खालोखाल ठाण्याची मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार ५८८ आहे.

राज्यात एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार असून यापैकी ४ कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष व ४ कोटी ४४ लाख ०४ हजार ५५१ महिला आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ४ जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. तर राज्यात ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत.

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर व छत्रपती संभाजी नगर या ५ जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली व पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech