नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील ८ व्या शतकातील प्राचीन मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार येणार आहे. सम्राट ललितदित्य मुक्कपाद यांनी बांधलेले हे मंदिर भारतातील सर्वात जुने सूर्यमंदिर आहे. मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिकंदर शहा मिर यांच्या आदेशावरून हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते. ही वास्तू सध्या पुरातत्त्व खात्याने संरक्षित केली आहे.
याबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकार्यांची बैठक झाली. त्यात सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मंदिराला भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांनी यज्ञात सहभाग घेतला होता. त्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धारचा विचार सुरू झाला होता.