पुणे रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट विक्रीवर घातली बंदी

0

पुणे : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्यासह सात रेल्वे स्थानकांवर ८ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांव्यतिरिक्त फलाटावर येणाऱ्यांना मज्जाव केला आहे. रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे.

पुणे स्थानकावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दीड लाख इतकी आहे. तर सुमारे ५ ते १० हजार व्यक्ती प्रवाशांना सोडण्यासाठी पुणे स्थानकावर दाखल होत असतात. त्यामुळे फलाटावर गर्दी वाढत जाते. दिवाळीच्या काळात तर गर्दीचा उच्चांक असतो. गर्दी वाढल्याने कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट तिकिटावर बंदी घातली आहे. मात्र, प्रवासी जर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अथवा ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल अशा प्रवाशांसोबत फलाटावर येण्यासाठी मुभा दिली आहे. केवळ अशा व्यक्तींनाच फलाटाचे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कालपासून करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech