यूपीएससी पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक जारी

0

मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) येत्या २०२५ वर्षात होणा-या विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर वेळापत्रत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा २५ मे ला होणार आहे. उमेदवारांना संकेतस्थळवर वेळापत्रक उपलब्ध आहे. यूपीएससी पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २०२५ आणि आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) २०२५ चे आयोजन २५ मे २०२५ रोजी करण्यात आली आहे.

या संदर्भातील अधिसूचना २२ जानेवारी २०२५ ला जारी करण्यात येईल. उमेदवारांना ११ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणा-या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सव्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

तर मुख्य परीक्षा २२ ऑगस्टपासून सुरू होणर आहे. उमेदवारांना नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नोंदणी करता येईल. २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा १६ नोव्हेंबरला सुरू होईल.अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वपरीक्षा होईल. २६ जूनला मुख्य परीक्षा पार पडेल. संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, तर मुख्य परीक्षा २१ जून रोजी आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा २० जुलैला होणार आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (पीटी) परीक्षा २०२५ चे आयोजन ९ फेब्रुवारी आणि संयुक्त भू वैज्ञानिक परीक्षेचे आयोजन देखील ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा २१ जून रोजी होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech