वारीसाठी तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज

0

सोलापूर- (ता. पंढरपूर) येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी तब्बल ३० टक्के अतिरिक्त भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. त्या धर्तीवर यंदा प्रथमच ६५ एकरच्या धर्तीवर वाखरीतही ५२ एकर परिसरात स्वतंत्र १५ एकर विस्तारित पालखीतळाची संकल्पना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राबविली आहे.

पायी चालून आलेल्या भाविकांचा थकवा घालविण्यासाठी वाखरी ग्रामपंचायतीमार्फत खास १२ लोकांची टीम मोफत मसाज करण्यासाठी पाचारण केली आहे. येथे आयुर्वेदिक तेलाने २० खुर्च्यांवर २४ तास मसाज करून भाविकांचा थकवा घालविण्यात येणार आहे.काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून नदी पलीकडे ६५ एकर पालखीतळाचा विकास करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व शहरातील गर्दीचा ताण कमी झाला होता.

त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी पालखीतळावर यावर्षी येणाऱ्या भाविकांच्या अधिकच्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वाखरी- टाकळी बायपासच्या शेजारी ५२ एकर परिसरात स्वतंत्र १५ एकर पालखीतळ विकसित करून त्या ठिकाणी दिंड्यांच्या वास्तव्याची सोय केली आहे. त्या ठिकाणी दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा व भोजन देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech