जगभरात बुधवारी रात्री व्हॉट्सॲप अर्धा तास बंद

0

न्युयॉर्क – सर्वसामान्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेले व्हॉट्सॲप बुधवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबाराच्या सुमारास अचानक बंद पडल्याने जगभरातील लोकांना अनेक अडचणी आल्या. जगभरातील लाखो युजर्सनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तशा तक्रारी केल्या.

व्हॉट्सॲप व फेसबुकच्या मेटा या मूळ कंपनीकडील काही तांत्रिक बिघाडामुळे युजर्सना मेसेजेस पाठवण्यास व मिळण्यास अडचणी आल्या. अनेकांना व्हॉट्सॲप ॲप व व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करण्यासही अडचण आली. ॲपची सेवा ठप्प होण्याचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही. साधारण अर्ध्या तासानंतर सेवा पुन्हा सुरू झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech