लखनौ – यूपीमध्ये लोकसभेच्या १२ अशा जागा आहेत, जिथे २००९ नंतर प्रत्येक वेळी नवा उमेदवार विजयी होत आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, संभल, अमरोहा, रामपूर, बिजनौर, मुरादाबाद, पूर्व उत्तर प्रदेशातील घोसी, गाझीपूर, लालगंज, श्रावस्ती, फुलपूर, जौनपूर या जागांचा समावेश आहे.
२००९ मध्ये लोकसभेच्या नवीन जागा निर्माण झाल्या. राज्यातील २८ जागांवर तिस-यांदा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यमान खासदार रिंगणात आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, हेमामालिनी, केंद्रीय मंत्री पंकज चौधरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, संजीव बल्यान, कौशल किशोर आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. राजनाथ सिंह २००९ मध्ये गाझियाबादमधून निवडणूक जिंकले होते. २०१४ पासून ते लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. भाजपने २०१४ मध्ये १७ आरक्षण असलेल्या जागांवर विजय मिळवला. २०१९मध्ये भाजपला १५ जागा मिळाल्या.
दोन जागांवर बसपाने विजय मिळवला. सलग लोकसभेच्या जागा जिंकण्याचा विक्रम मनेका गांधींच्या नावावर आहे. मनेका यांनी १९८९ मध्ये पहिल्यांदा पिलिभीतमधून विजय मिळवला. १९९१ पासून सातत्याने जिंकत आहे. १९५२ पासून राज्यातील ८० पैकी ३४ जागांवर एकही महिला खासदार निवडून आलेली नाही. यामध्ये गाझियाबाद, गौतम बुद्धनगर, आग्रा, वाराणसी, एटाचा समावेश. भोला सिंग तिस-यांदा बुलंदशहरमधून निवडणूक लढवत आहेत.