भुसावळ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसंच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करत असताना अचानक लाईट गेले आणि अंधार झाला. त्यानंतर उपस्थितांनी मोबाईलचे लाईट लावले. त्या प्रकाशात त्यांनी भाषण सुरुच ठेवलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. तुमचे लाईट सुरु झाले आहेत, आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं.
भुसावळच्या सभेत देवेंद्र फडणवीस रक्षा खडसेंच्या प्रचाराचं भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेले. ज्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही काळजी करु नका. लाईट बंद झाले असले तरीही तुम्ही मोबाईलचे लाईट सुरु केले आहेत. आपला करंटच असा आहे की लाईटची आवश्यकता नाही. काय सुंदर दृश्य आहे बघा. हमको रोक सके ये किसी अंधेरेमें दम नही, रोशनी हमसें है रोशनी से हम नहीं.” असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
इंडिया आघाडीचे सगळे नेते म्हणतात आम्हीच इंजिन आहोत. तुमच्यासाठी, जनतेसाठी त्यामध्ये जागा नाही. रक्षा खडसेंना निवडून द्या म्हणजे मोदींच्या विकासाची गाडी ही सगळ्यांना त्यामध्ये सामावून घ्या. रक्षाताईंना निवडून दिलं की तो डबा मोदींच्या विकासाच्या इंजिनला लागणार आहे हे विसरु नका. असंही फडणवीस म्हणाले. आज आपण पाहू शकतो की गेल्या दहा वर्षांत मोदींनी देशात परिवर्तन घडवलं आहे. जगातले लोक त्यामुळे चकित झाले आहेत. जगात आज मोदी मॉडेलची चर्चा होते आहे. मोदींनी १० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढलं. १० कोटी महिलांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज दिलं. त्यातून ३ कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत.