मुंबई – भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी डॉ दिनेश शर्मा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवास स्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार आदी उपस्थित होते. रखडलेले जागावाटप, महायुतीच्या संयुक्त प्रचार सभा तसेच प्रचाराच्या रणनीती बाबत यावेळी चर्चा झाल्याचे कळते.