शास्त्रीय संगीत आणि नृत्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो – चंद्रकांत पाटील

0

पुणे : आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. त्यातून सर्वांना आनंद मिळतो असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीत आणि नृत्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नृत्य गुरु शमा भाटे, नृत्य गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, भाजपा सरचिटणीस तथा‌ कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त कलाकार आपला कलाविष्कार सादर करत असून, देशातील दोन नामांकित संस्था देखील सहभागी झाल्या आहेत.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक कलाकारांना संवाई गंधर्व मध्ये आपली कला सादर करण्याची इच्छा असते. आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. , पाश्चात्य संगीतातून आनंद मिळतो असे नाही. सध्या डीजे डॉल्बी आणि त्याला जोडीला ड्रग्ज आले आहे. त्यामुळे हे तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. याला सांस्कृतिक कार्यक्रम उत्तर आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला आहे. त्यामुळे तो आज आपापल्या परीने कला सादर करत असतो. कोणी आपल्याला आवडणारे गाणं गुणगुणत असतो. तर कोणी बंद खोलीत नृत्य करतो. त्यातून एक सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे आनंद बाहेर शोधण्याऐवजी, स्वतः मध्येच शोधला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.‌

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech