त्र्यंबकेश्वर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वार देवस्थानातील ६०० रुपये किमतीचे दर्शन तिकिटे १४०० रुपयांना विकली यासंदर्भात सदर यात्रेकरू भाविकांनी मंदिर ट्रस्ट व पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे यामुळे भाविकांमध्ये व नगरीत मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार त्रंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी नेहमीच भाविकांच्या रांगा असतात गर्दी लक्षात घेऊन २२ मार्च रोजी सुरज गुजरात येथील चिराग दालिया व मित्र यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका अनोळखी व्यक्तीकडून दोनशे रुपये किमतीची ऑनलाईन तीन तिकिटे सहाशे रुपयांची १४०० रुपयांना विकत घेतली. मंदिर गेटवर सदर तिकीट स्कॅनिंग यंत्रणेने नाकारले. त्यामुळे भाविकाला दर्शन घेता आले नाही.
सदर भाविकांनी त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कार्यालयात लेखी तक्रार केली ट्रस्टने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही व तपासात संशयित नारायण मुतडक या तरुणाने ही तिकिटे विकल्याचे दिसून आले. दर्शनासाठी वारंवार भाविकांना ठकले जाते परंतु त्यात ट्रस्ट व पोलीस हे तक्रार लक्ष घालत नव्हते उशिराने का होईना संबंधित कारवाई करतील असे भाविकांना वाटत आहे. दरम्यान असे तिकिटे अहस्तरणीय असताना बोगस तिकीट ? दिसून आले. त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. देवस्थान ट्रस्ट त्यामुळे आता या तिकिटांवर संबंधित भाविकांचा फोटो छापावा अशी मागणी होऊ लागली आहे.