२४ वॉर्डात बॅनरसाठी राखीव स्थळ बनविण्याची मागणी

0

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या सूचना

मुंबई :  मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन जाहिरात धोरण बनविण्यासाठी भायखळा येथील जिजामाता उद्यानात आयोजित सुनावणीत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विविध सूचना दिल्या. ज्यात २४ वॉर्डात बॅनरसाठी राखीव स्थळ बनविण्याची प्रमुख सूचना होती.

पालिका उपायुक्त चंदा जाधव यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सूचना मांडल्या. मुंबईतील पदपथ जाहिरात फलक मुक्त करावेत. यात पालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटी आणि रेल्वे संबंधातील जाहिरात फलकाचा समावेश आहे.

महाराष्ट्र आग व सुरक्षा अधिनियम २००६ अंतर्गत प्रत्येक सहा महिन्यात जाहिरात फलकाचे सुरक्षा ऑडिट करावे. मुंबईतील २४ वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जाहिरात करण्यासाठी काही समर्पित स्थळ निश्चित केल्यास पालिकेला महसूल प्राप्त होईल. यामुळे अनधिकृत जाहीरात फलक लावण्याच्या बाबी कमी होतील. तसेच लेझर जाहिराती आणि निर्माणधीन इमारतीत जाहिरात बाबत परवानगी दिल्यास शासकीय महसूलीत वाढ होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech