नागपूर : भाजपने १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतल्याने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी विजयानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली. देवेंद्रने खूप मेहनत घेतली; तो २०-२० तास काम करायचा. माझी इच्छा आहे की तो पुन्हा मुख्यमंत्री व्हावा,असे त्या म्हणाल्या. फडणवीस यांचे भाऊ आशिष फडणवीस यांनीही आनंद व्यक्त करत, देवेंद्र मुख्यमंत्री व्हायला हवा, असे म्हटले. विजयाच्या या क्षणाने संपूर्ण फडणवीस कुटुंबाला भावनिक केले आहे.
निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीपासूनच फडणवीस आघाडीवर होते. त्यांच्या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर महाविकास आघाडीच्या कार्यालयांमध्ये शांतता पसरली. महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करत २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून सहाव्यांदा दणदणीत विजय मिळवला.