रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड येथे शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 नक्षलवाद्यांना ठार केले. यापरिसरात जवानांची शोधमोहिम आणि गोळीबार दोन्ही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार, उत्तर अबुझमाड भागात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या संयुक्त पोलिस पथकाने शनिवारी सकाळी 8 वाजता शोध मोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सुरू होताच सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात 5 नक्षलवादी ठार झाले. तर सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी झालेत. याठिकाणाहून पोलिसांनी काही शस्त्रास्त्रे जप्त केली असून आतापर्यंत 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले आहेत.