(संभाजी मोरे)
टिटवाळा – श्रीक्षेत्र टिटवाळा ते श्रीक्षेत्र शिर्डी गुरुपौर्णिमेनिमित्त साई अश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाळा पालखी सोहळ्यातील साईभक्त यांचा पदयात्रेदरम्यान वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी कल्याण तहसीलदार त्यांच्याकडे शिवसेना विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी केली.
साई आश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाळा गेल्या अनेक वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो साईभक्त पदयात्री पालखीसोबत शिर्डी कडे मुखामध्ये साई नाम घेऊन गुरुच्या दर्शनासाठी जातात, यावर्षी आनंदाने चाललेल्या साई भक्तांवर काळाने झडप घालून अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण तीन साई भक्तांना भरधाव आलेल्या चार चाकी वाहनाने चिरडले काही साईभक्त जखमी झाले या वेदनादायी दुःखद घटनेत *१)भावेश पाटील,२) रवींद्र पाटील, ३) साईराज भोईर* यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यांच्या पक्षात आई वडील पत्नी लहान मुले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून होत होता आपली कमावती मुले गमावल्याने पाटील आणि भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेने मांडा टिटवाळा विभाग ग्रामस्थ मित्रपरिवार यामध्ये शोककला पसरली असून कमावती मुले गमावल्याने आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात यामुळे या कुटुंबाला सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी पंढरपूर यात्रेमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली याचप्रमाणे शिर्डीच्या पदयात्रेत मयत झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून कल्याणचे तहसीलदार सचिन शेजल यांना *किशोर शुक्ला विधानसभा संघटक कल्याण (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), श्रीधर खिस्मतराव विभाग प्रमुख, राजेश दीक्षित काँग्रेस विभागीय अध्यक्ष मांडा टिटवाळा, ॲड जयेश वानी युवा सेना सहसचिव, महेश एगडे युवा सेना शहर सचिव, संतोष पवार शाखाप्रमुख, मनीष चौहाण,उपविभाग प्रमुख, संजय मांडे जेष्ठ शिवसैनिक ॲड. संजय भोजने यांच्यासह निवेदन दिले.
यावेळी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजल यांनी संबंधित घटनेची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवतो आणि मयत साई भक्तांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.