मुंबई – मुंबईतील मालाड परिसरात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडले. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिलीअसल्याचे वृत्त आहे.
मालाड परिसरातील एका महिलेने आईस्क्रीमची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्यात धाव घेतली.. मालाड पोलिसांनी संबंधित आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवले असल्याचे मालाड पोलिसांनी सांगितले.