मनोज जरांगे यांची ड्रोन ने टेहळणी.. विजय वडेवट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

0

(अनंत नलावडे)

मुंबई – अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत.आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल करत ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे.त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधासभेत बोलताना केली.

अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे वृत्त आल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे दिसत आहे.टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? असल्या प्रकाराने येथील रहिवाशीही भयभीत झाले असून याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे.त्यामुळे जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या व ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची आग्रही सूचनाही वडेट्टीवार यांनी केली.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी पोलीसांकडून अहवाल घेणार असल्याचे स्पस्ट केले.
……………………..(समाप्त)………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech