सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या राष्ट्रीय कार्यकारी समीतिच्या अध्यक्षपदी आमदार संजय केळकर

0

ठाणे: ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या राष्ट्रीय कार्यकारी समीतिच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक व दुर्गरत्न म्हणून ओळखले जाणारे श्रमिक गोजमगुंडे यांनी काल आ. केळकर यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश विनेरकर, प्रकाश नायर, गौरव शेवाळे, अतुल पडवळ, संगीता जाधव, अनिकेत कडव, गणेश मांगले व दुर्गसेवक उपस्थित होते. 

गेली 12 वर्ष आ. केळकर यांच्याकडे संघटनेची महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. विधिमंडळ अधिवेशनात गडकिल्ल्यासंदर्भात अनेक विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे. शिवभक्त म्हणून त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे. आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात “ठाणे मुक्ती दिन” हा पहिल्यांदा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे पोर्तुगीजांच्या जोखीडीतून ठाणे कसे मुक्त करण्यात आले हे ठाणेकरांना माहित झाले. आजही हा कार्यक्रम दरवर्षी 27 मार्च रोजी ठाण्याच्या मध्यवर्ती करागृहात मोठ्या उत्सहात सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत साजरा केला जातो.

सहयाद्री प्रतिष्ठान च्या महाराष्ट्रात ७० पेक्षाही अधिक शाखा असून आतापर्यंत २५,००० पेक्षाही अधिक दुर्ग सेवक नोंदणी झाली आहे. श्रमिक गोजमगुंडे व आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे ५ नवीन तोफा प्रकाशात आणल्या गेल्या आहेत. 

२५ तोफाना तोफगाडे बसविले आहेत. (उदा. प्रतापगड, उंदेरी किल्ले. ). ६ लोखंडी ओतीव तोफगाडे, विविध गडावर १८ प्रवेशद्वार (उदा. जीवधन, तोरणा, हरिहर, राजगड). आतापर्यंत २००० पेक्षाही अधिक दुर्ग संवर्धन मोहीमा घेण्यात आल्या आहेत. राजमुद्रा स्मारक ३ गडावर बसविले (उदा. हडसर, मोरगिरी). आतापर्यंत गडावरील ६ मंदिराचा जीर्णोद्धार तसेच मुरारबाजी देशपांडे समाधी जीर्णोद्धार, तानाजी मालुसरे स्मारक उभारणी, पद्मदुर्ग सहित अनेक गडावर भगवा ध्वज उभारणी, तर ‘शौर्या तुला वंदितो’ या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी भारतीय सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. अशी अनेक महत्वाची कामे व कार्यक्रमे प्रतिष्ठान मार्फत झाली असून पुढेही अनेक कामे गडावर करायचे असल्याची आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी आमची संगठना आहे. जास्तीत जास्त तरुणांना संघटनेत सामील करण्याचा मानस असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech