राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकीचा गोळीबारात मृत्यू

0

मुंबई  : अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी र‍ाज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर  १२ ऑक्टोबरच्या रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात धावला. राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.उपचारासाठी लिलावती रुग्णालयात केले दाखल होते बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून पक्षत्याग करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत.

झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर आज, शनिवारी बाबा सिद्दीकींवर 3 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांच्यावर सुमारे 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत बाबा सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत

सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदावरून पायउतार व्हावे यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अतिशय धक्कादायक. माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी.

बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. काँग्रेस पक्षात आणि राज्याच्या मंत्रीमंडळात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्व सिद्दिकी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे ट्विट काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते म्हणाले की, मुंबईसारख्या शहरामध्ये वाय दर्जाची सुरक्षा असणा-या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची हत्या होते यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्यांच्या घटनेमुळे मुंबई आता सुरक्षित शहर राहिलेले नाही; पोलीस आणि गृहविभाग कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक आहे का ? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाहीची अपेक्षा, महाराष्ट्रातील माजी मंत्री,ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांचा आज रात्री गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत आ. अमित देशमुख यांनी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मंत्री राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांची गोळ्या झाडून हत्या होते यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र पोलीस या गुन्ह्याचा तपास गांभीर्यपूर्वक करतील, गुन्हेगारांना पकडून त्यांना कठोर शिक्षा मिळण्याचा दृष्टीने कार्यवाही करतील अशी अपेक्षा काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

सिद्दीकी यांच्या निधनाने एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला. मत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना. अशा शब्दात खा. अशोक चव्हाण यांनी संवेदना व्यक्त केली.

बाबा सिद्दिकी यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक युवक काँग्रेसच्या काळापासूनचे माझे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दिकी यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दुःख व्यक्त केले.

एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब असा संताप व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. बाबा सिद्दिकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला बळ हीच प्रार्थना, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपले दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech