भांडुप – गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशन च्या पाटी, पुस्तक प्रकल्पा अंतर्गत भांडुपच्या सुभाष नगर बीएमसी शाळेत CEAT टायर हॉल मध्ये पुस्तक वाचन व कविता लेखन या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी दहा ते चौदा वयोगटातील लहान मुलांना ठाण्यातील साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन दिले.गोल्डन लेटर्स फाऊंडेशन च्या अध्यक्षा, विश्वस्त डॉ राणी खेडीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी रुपेश पवार यांनी मुलांना सांगितले, वाचन व लिखाणातून माणसाचे ज्ञान वाढते, त्यातून माणसाची बुद्धी प्रगल्भ होते. या अशा प्रगल्भतेतून माणसाचा विकास झालेला आहे. प्राचीन काळात वाचन संस्कृतीचा विस्तार कसा झाला याबद्दल रुपेश पवार यांनी थोडक्यात मुलांना माहिती दिली. ही माहिती देत असताना रुपेश यांनी हळूहळू मुलांना समजेल अशा भाषेत वाचनाचे महत्त्व समजून दिले.
रुपेश पवार हे स्वतः शरीराने दिव्यांग आहेत. त्यांच्या डोळ्यात बालपणी मोतीबिंदू होते, तरी त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेत कानाने ऐकून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी बीए एलएलबी, पत्रकारिता, ग्रंथालय शास्त्र या पदव्या मिळवत समाजात मानाचे स्थान मिळवले. गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशन च्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांनी रुपेश पवार यांचा परिचय सर्वांना करून दिला. त्या म्हणाल्या दृष्टीदोषावर मात करून रुपयेजींनी जे जीवन कार्य करून दाखवले आहे, ते वाखाण्याजोगे आहे. स्पष्ट दृष्टी नसताना शिक्षणाचा ध्यास घेणे ही अवघड गोष्ट आहे. ती रुपेश पवारांनी सहज साध्य केली. पुढे त्यांनी सांगितले रुपेशजींनी कविता लेखनाबद्दल जे काही सांगितले आहे. त्यावर मुलांनी विचार, कृती करून तशा प्रकारचे लिखाण करावे.
जवळ पास एक तासांचा हा सेमिनार होता. यात मुलांनी शेवटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि साहित्यिक रुपेश पवार यांचे आभार मानले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका, गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशनच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर, रुपेश यांचे वडील बी के पवार, आजोबा नथुराम जाधव , CEAT Tyres च्या वेल्फेअर प्रमुख श्रीमती मंगल मॅडम ,संजना मॅडम, लोकराजा कॅनलचे भुजंगराव सोनकांबळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट