पहलगाम येथे भ्याड अतिरेकी हल्याचा मुंबई भाजपाकडून निषेध

0

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्याचा मुंबई भाजपाकडून आज निषेध करण्यात आला. सहा जिल्हयातील सहा ठिकाणी सभेचे आयोजन करून हा निषेध करण्यात आला. दादर पूर्व येथे भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्यातीने सभेचे आयोजन केले होते यावेळी मुंबई महामंत्री सुनिल राणे, आमदार संजय उपाध्याय, आमदार कॅप्टन तमिल सेलवन यांच्यासह कार्यकर्त्यांनी अतिरेक्यांचा धिक्कार केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्यासह महामंत्री निरज उभारे, विलास आंबेकर मुंबई सचिव जितेंद्र राऊत व नगरसेविका राजेश्री शिरवडकर, नेहल शहा, आशा मराठे, महादेव शिवगण अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच उत्तर मुंबईतर्फे एस.व्ही रोड येथे जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला यामध्ये आमदार अतुल भातकळकर, योगेश सागर, मनिषा चौधरी, माजी खासदार गोपाळ शेटटी, माजी आमदार विजय भाई गिरकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच उत्तर पश्चिम व उत्तर मध्य, दक्षिण व इशान्य मुंबई जिल्हयातही अशाच प्रकारे जोरदार निषेध करण्यात आला यावेळी स्थानिक आमदार आणि भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech