राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी आज, बुधवारी मतदान झाले. संघ मुख्यालयाचा परिसर मध्य-नागपूर मतदारसंघात येतो. याठिकाणी भाजपचे प्रवीण दटके आणि कांग्रेसचे बंटी शेळके यांच्यात प्रमुख लढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सकाळी 7 वाजता स्थानिक भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत मराठीसह बॉलिवूडविश्वातील सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच अनेकांनी कलाकारांनी मतदान केल्यानंतर चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासह मतदान केले. अभिनेता हेमंत ढोमे याने ही सोशल मीडियावर मतदान केल्याचे फोटो शेअर केले आहेत. ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अभिनेत्री सायली संजीवने मतदानाचा हक्क बजावला आहे.मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या कुटुंबासह नागपुरातील महाल परिसरातल्या मतदान केंद्रात मतदान केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज, बुधवारी मतदान झाले. यावेळी मध्य-नागपूर मतदारसंघात गडकरींनी मतदान केले. याठिकाणी भाजपचे प्रवीण दटके, कांग्रेसचे बंटी शेळके यांच्यात प्रमुख लढत आहे. महाल परिसरातील टाऊन हॉल मतदान केंद्रात जाऊन गडकरींनी मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी, निखील, सारंग (मुले) आणि ऋतुजा, मधुरा (सुना) या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर संवाद साधताना गडकरी म्हणाले.
नागपूरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी बेझनबाग येथील गुरुनानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या खोली क्र.५ येथे सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे