इंग्लंड – इंग्लंडच्या वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर या ३०० वर्षांहून अधिक जुन्या घरात असलेल्या ब्लेनहाइम पॅलेसमध्ये १८ कॅरेट सोन्याचे टॉयलेट तब्ब्ल ४८ लाख पौंड म्हणजे अंदाजे ५०,५४,३४,५६१.१२ रुपये किमतीचे सोन्याचे टॉयलेट हे प्रदर्शनाचा एक भाग म्हणून लावले होते. परंतु, एका चोराने चक्क चालू अवस्थेतील ते टॉयलेट प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरून नेले होते. नंतर त्याने त्या चोरीची कबुलीदेखील दिली आहे, अशी माहिती ‘द गार्डियन’च्या अहवालावरून मिळते. ते टॉयलेट सप्टेंबर २०१९ सालच्या प्रदर्शनाचा एक भाग होते.
‘अमेरिका’ नावाचे हे तब्बल ५० कोटीं रुपयांचे आलिशान कमोड, इटलीच्या प्रसिद्ध मॉरिझिओ कॅटेलन नावाच्या एका वैचारिक कलाकाराने तयार केले होते. ब्लेनहाइम पॅलेस युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान असल्याने त्या जागेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.