वॉशिंग्टन – अमेरिकन अंतराळ संस्था नासा ‘मिशन मून एक्सप्रेस’ या नव्या महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत चंद्रावर पेलोड वाहतूक करण्यासाठी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर वाहतूक करणे सोपे होणार आहे. हा प्रकल्प एखाद्या सायन्स फिक्शनसारखा असला आणि अशक्य वाटत असला तरी पुढील काही वर्षांत तो प्रत्यक्ष साकारू शकेल. यासाठी नीधीही गोळा केला जात आहे. हे मिशन यशस्वी झाल्यास मानवजातीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे यश असेल. याबाबत नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले, हा प्रकल्प यशस्वी होईल याची शाश्वती नाही, मात्र भविष्यात मून एक्सप्रेस मिशन एरोस्पेस मिशनचा भाग बनू शकते. या प्रकल्पाबरोबर मंगळावर मानव आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्याचादेखील नासाचा प्रयत्न आहे.